झोपडपटटीतून कोरोना होतोय हद्दपार रुग्णांची संख्या घटतेय, मुंब्रा पोठापाठ कोपरीतही कोरोना आला शुन्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 03:36 PM2020-08-11T15:36:55+5:302020-08-11T15:38:22+5:30

ठाणे महापालिका हद्दीत झोपडपटटी भागात कोरोनाचा सुरु असलेला मोठ्या प्रमाणातील शिरकाव आता हळू हळू का होईना कमी झाला आहे. मुंब्य्रा पोठापाठ सोमवारी कोपरीतही कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर शहरातील इतर झोपडपटटी भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे.

Corona emerges from slums The number of deported patients is declining. | झोपडपटटीतून कोरोना होतोय हद्दपार रुग्णांची संख्या घटतेय, मुंब्रा पोठापाठ कोपरीतही कोरोना आला शुन्यावर

झोपडपटटीतून कोरोना होतोय हद्दपार रुग्णांची संख्या घटतेय, मुंब्रा पोठापाठ कोपरीतही कोरोना आला शुन्यावर

Next

ठाणे : झोपडपटटी भागात कोरोनाचा शिरकाव झाला आणि ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून आले. लोकमान्य नगर, वागळे, कळवा, मुंब्रा इतर झोपडपटटी भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु आता मात्र ठाणेकरांसाठी दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. ठाण्यातील झोपडपटटी भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटत असून मुंब्य्रा पाठोपाठ कोपरीतही कोरोनाचा सोमवारी एकही नवा रुग्ण आढळला नाही. तर मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे दिसून आले आहे.
                कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला त्यावेळेस ठाणे शहर हे रुग्ण वाढीच्या संख्येत अग्रस्थानी होते. तर मृत्युचा दरही वाढतांना दिसत होता, शिवाय रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी होते. परंतु मागील दिड महिन्यात पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे कोरोनावर अंकुश मिळविण्यात यश आले आहे. परंतु सुरवातीला सोसायटींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यानंतर मात्र लोकमान्य नगर, वागळे, कळवा आणि मुंब्रा भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसून आली. प्रत्येक प्रभागात कधी ५० तर कधी १०० अशी रुग्ण संख्या दिवसाला आढळून येत होती. त्यामुळे रुग्णालयातील बेडही कमी पडू लागल्याचे चित्र दिसत होते. पालिकेची सुध्या तारेवरची कसरत सुरु झाली होती. त्यात येथील रुग्ण संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतांना तिकडे माजिवडा - मानपाडा भागातील झोपडपटटीमध्येही कोरोनाने वेगाने संचार केल्याचे दिसून आले. आजही याच प्रभागात सर्वाधीक रुग्ण आढळतांना दिसत आहेत. परंतु पालिकेच्या माध्यमातून या झोपडपटटी भागात ताप सर्व्हे क्लिनीक, कोरोनाच्या रॅपीड टेस्टींग, अ‍ॅटीझम चाचण्या वाढविण्यात आल्या. तसेच एखादा कोरोना बाधीत आढळला तर त्याच्या संपर्कातील सुमारे २० जणांना क्वॉरन्टाईन करण्यात येऊ लागले. त्यामुळे हळू हळू का होईना कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही आता कमी होतांना दिसत आहे.
सुरवातीला मुंब्य्रातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिकेची झोड उठविली गेली होती. परंतु आज मुंब्य्रानेच ठाण्यासमोर नाही तर राज्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. आता मुंब्य्रा पोठापोठ आता कोपरीमध्येही सोमवारी नवीन शुन्य कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे मुंब्य्रात सुरवातीला ४० ते ६० असे रोजचे रुग्ण आढळत होते. आता मात्र येथे १ ते ५ नवीन रुग्ण आढळत आहेत. तिकडे लोकमान्य नगर आणि वागळे इस्टेट भागातील झोपडपटटीतही कोरोनाने जोरदार शिरकाव केला होता. परंतु आजच्या घडीला येथील नवीन रुग्णांची संख्याही घटत असल्याचे चित्र आहे. इतर प्रभाग समितीमध्येही नवीन रुग्णांची संख्या कमी प्रमाणात आढळत आहे. त्यामुळे आता ठाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचे दिसत आहे. सोमवारी शहरात केवळ १५४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील संख्या जास्तीची आढळून आली आहे. मागील काही दिवसात याच प्रभाग समितीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. परंतु इतर प्रभाग समितीत ही संख्या घटतांना दिसत आहे. परंतु एकूण उपाचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही कमी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही प्रत्येक प्रभाग समितीत वाढलेल्याचे दिसून आले आहे.
प्रभाग समिती निहाय करोनाबाधित रु ग्ण संख्या
प्रभाग समिती           उपचार सुरु रु ग्ण         बरे झालेले रु ग्ण         मृत्यु            एकूण रु ग्ण
माजिवाडा-मानपाडा      ५८०                             २५७९                   ८०                ३२३१
वर्तकनगर                      २९०                            १७९१                     ५२               २१३३
लोकमान्य-सावरकर       २९६                           २४६२                   १०८               २८६६
नौपाडा-कोपरी               ३९५                           २९३७                  १२८                ३४६०
उथळसर                       २४६                           १९५९                   ६६                 २२७१
वागळे इस्टेट                  १५३                           १७१३                   ७७                 १९४३
कळवा                           ३८२                          २३२८                  ८६                   २७९५
मुंब्रा                               १०५                          १०७५                  ७८                   १२५८
दिवा                              १६९                          ८६५                    २३                    १०५७
टिएमसी क्षेत्राबाहेरील    १४९
---------------------------------------------------------------------------------------
एकूण                          २३४५                         १८१५१               ६७६                 २११७२
 

Web Title: Corona emerges from slums The number of deported patients is declining.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.