Join us

मुंबईत धुवाधार बरसला

By admin | Updated: July 11, 2014 00:43 IST

गुरुवारीही आपला जोर कायम ठेवलेल्या पावसाने दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगराला सायंकाळी 4 नंतर अक्षरश: झोडपून काढले.

मुंबई : गुरुवारीही आपला जोर कायम ठेवलेल्या पावसाने दक्षिण मुंबईसह मध्य मुंबई व पूर्व-पश्चिम उपनगराला सायंकाळी 4 नंतर अक्षरश: झोडपून काढले. ऐन पीक अवरला पावसाने दमदार बॅटिंग केल्याने शहरासह उपनगरातील सखल भागात पाणी साचले आणि ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली.
येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने बुधवारी दिला होता. तसा तो काही प्रमाणात खराही ठरला. गुरुवारी सकाळपासून दुपारी 3 वाजेर्पयत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत होत्या. मात्र त्यांचा वेग कमी होता. परिणामी, रस्ते वाहतुकीसह लोकलची वाहतूकही नियमित सुरू होती. परंतु दुपारनंतर दाटून आलेल्या ढगांनी शहरावर एकच गर्दी केली; आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. कुलाबा, मरिन ड्राइव्ह, वाळकेश्वर, हाजी अली, एलफिन्स्टन, लालबाग-परळ, हिंदमाता, वरळी, प्रभादेवी या भागांना दमदार पावसाने झोडपून काढले. पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड तर पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, बोरीवली आणि गोरेगाव येथे दुपारी 3 नंतर दमदार पावसाने हजेरी लावली.
तब्बल दोनएक तास पाऊस लागून राहिल्याने चिंचपोकळी येथील सरदार हॉटेल, दादर येथील हिंदमाता, कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिग्नल आणि कमानी जंक्शनसह बोरीवली सब-वे या सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. शिवाय विद्याविहार आणि कुर्ला स्थानकाच्या पश्चिमेला पावसाचे पाणी साचले होते. सेनापती बापट मार्ग, सात रस्ता, पेडर रोड, जे.जे. फ्लायओव्हर, ना.म. जोशी मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि साकीनाका-कमानी जोडमार्ग येथील वाहतुकीचा वेग मंदावला होता. (प्रतिनिधी)
 
दिवसवेळलाटांची उंची
11 जुलैदुपारी 1 वा.4़2क् मीटर
12 जुलैदुपारी 1़45 वा.4़43 मीटर
13 जुलैदुपारी 2़3क् वा.4़57 मीटर
14 जुलैदुपारी 3 वा.4़6क् मीटर
15 जुलैदुपारी 4 वा.4़54 मीटर
16 जुलैदुपारी 4़3क् वा.3़38 मीटर 
 
च्राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसला तरी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उद्यापासून सलग सात दिवस समुद्रास येणा:या भरतीच्या लाटा सुमारे सव्वाचार ते साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या राहतील.