Join us

थर्टीफर्स्टच्या तयारीची धूम

By admin | Updated: December 27, 2014 22:23 IST

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०१५ च्या स्वागतासाठी मुंबईकरांचे जोरदार प्लानिंग सुरू झाले आहे.

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या २०१५ च्या स्वागतासाठी मुंबईकरांचे जोरदार प्लानिंग सुरू झाले आहे. थर्टीफर्स्टला धूम ठोकण्यासाठी समुद्रकिनारे, हॉटेल्स, रेस्टॉरंटसह गल्लोगल्लीपासून गच्चीपर्यंत तयारी सुरू झाली आहे़ गुलाबी थंडीत नेमका कशाचा आस्वाद घेत नववर्षात पदार्पण करायचे याचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे़पार्टीसाठी जागेची शोधाशोध तर डीजे लावण्यासाठी वर्गणी काढण्यासाठी चाळीतील व सोसायटीतील धडाधडीच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे़ व्यस्त कामातून आवर्जुन वेळ काढून जुन्या वर्षाचा बाहूला बनवणे, वर्गणीसाठी सर्व मित्रांना भेटणे ही कामे चालु झाली आहेत़ मुली व महिला देखील या कामात उत्साहाने हातभार लावत आहेत़ ज्येष्ठ नागरिकही यात मागे न राहता त्यांच्यापरीने नववर्षाच्या पार्टीची तयार करत आहेत़ (प्रतिनिधी)यंदाच्या थर्टीफस्टला सोशल मिडियाचीही जोड मिळाली आहे़ थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी व्हॉट्सअपवरही काही खास ग्रूप्स तयार केले असून थर्टी फर्स्ट पार्टीसाठी दमदार प्लानिंग सुरु आहे. काही मित्र-मैत्रिणींनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर पेज तयार करुन थर्टीफर्स्टच्या रात्रीचे प्लानिंग केले आहे. च्थर्टीफर्स्टला कार्यालयीन कामकाजात व्यस्त असणाऱ्या माहिमच्या उज्वला राणे यांनी यंदाचा थर्टी फर्स्ट वेगळा सेलिब्रेट करायचा ठरवल्याचे सांगितले. त्यासाठी काही वृद्धाश्रमांशी संपर्क करुन तेथील आजी-आजोबांच्या सहवासात केक कापून वेगवेगळे गेम्स खेळत नवीन वर्षाचे स्वागत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.च्मुंबईच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढत वरळीच्या मेघा साळुंके यांनी आपल्या २५ वर्षांपूर्वीच्या मित्र-मैत्रिणींना एकत्र करीत हटके ‘गेट-टुगेदर’ पार्टीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी खास अलिबाग येथे फार्महाऊस बुक करुन पार्टीची जंगी तयारी सुरु असल्याचेही नमूद केले. तर भायखळा येथील मोहित चव्हाणने यंदाची पार्टीही पबमध्ये सेलिब्रेट करणार असल्याचे सांगितले. च्त्यासाठी खास ईएमडी लाईट्सच्या म्युझिकवर धम्माल करणार आहे. विद्याविहार येथे राहणाऱ्या इशा काळे हिने सोसायटीतील चिमुरड्यांच्या साथीने रस्त्यावरील मुलांसोबत थर्टी फर्स्ट साजरा करायचा ठरविले आहे. लहानपणासूनच या मुलांनी सामाजिक जाण ठेवावी, म्हणून हा आगळावेगळे सेलिब्रेशन करत असल्याचेही सांगितले. च्थर्टीफर्स्ट डिसेंबर आणि एक जानेवारी अशा दोन्ही दिवशी जोगेश्वरी आश्रमात जाणार आहे. अनाथ मुलांबरोबर नवीन वर्ष साजरे करणार असून त्यांना कपडे आणि खाऊ भेट देणार असल्याचे ठाकूर कॉलेजचा विद्यार्थी प्रथमेश म्हात्रे यांनी सांगितले़