Join us

‘लिटोमेनिया’ फेस्टची आजपासून धूम

By admin | Updated: October 11, 2014 03:40 IST

भारतीय काय वाचत आहेत? हे जाणून घेण्यासाठी ‘थिंक व्हाय नॉट’ संस्थेने लिटररी फेस्टचे आयोजन केले आहे.

मुंबई: भारतीय काय वाचत आहेत? हे जाणून घेण्यासाठी ‘थिंक व्हाय नॉट’ संस्थेने लिटररी फेस्टचे आयोजन केले आहे. ‘लिटोमेनिया - द आॅक्टोबर लिट फेस्ट’ असे या फेस्टिव्हलचे नाव असून ‘लिटोमेनिया आॅन द व्हिल्स’खास आकर्षण असणार आहे. या फेस्टला उद्या ११ आॅक्टोबरपासून सुरवात होणार आहे.‘लिटोमेनिया आॅन द व्हिल्स’म्हणजे या फेस्टचे एक सेशन फिरत्या बसमध्ये होणार आहे. चालू बसमध्ये रोमान्स किंग समजले जाणारे रविंदर सिंग यावेळी त्यांच्या आगामी कादंबरीतील एक भाग वाचून दाखविणार आहेत. सायंकाळी ५ वाजता जूहू येथील रामादा हॉटेल येथून ही विशेष बस सुटणार आहे. या साहित्यीक उत्सवाची पर्वणी रसिकांना १२ आॅक्टोबर पर्यंत माटुंगा येथील व्हि स्कूल येथे अनुभवता येणार आहे. फेस्टिव्हलचे ‘लोकमत युवा नेक्स्ट’ माध्यम प्रायोजक असून ‘त्रिधातू रिअ‍ॅलिटी अ‍ॅण्ड इन्फ्रा’ सादरकर्ते आहेत. (प्रतिनिधी)