Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत अज्ञात तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:16 IST

मुंबई : धारावीतील प्रेमनगरातील मिठी नदीच्या पात्रात सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

मुंबई : धारावीतील प्रेमनगरातील मिठी नदीच्या पात्रात सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृताचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमनगरातील मिठी नदीच्या पात्रात एक मृतदेह पडला असल्याची माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपासणीसाठी पाठवून दिला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे़ इतर पोलीस ठाण्यात इसम बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याचा तपास सुरू आहे़