Join us
Daily Top 2Weekly Top 5

धारावीत शाळकरी मुलीचा डेंग्यूने मृत्यू

By admin | Updated: October 13, 2016 04:26 IST

धारावीतल्या संत कक्कया मार्गावरील लोकमान्य टिळकनगर परिसरात एका १४ वर्षीय मुलीचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. मोनिका शिवाजी शिंदे (१४) असे या मुलीचे नाव

मुंबई : धारावीतल्या संत कक्कया मार्गावरील लोकमान्य टिळकनगर परिसरात एका १४ वर्षीय मुलीचा मंगळवारी डेंग्यूने मृत्यू झाला. मोनिका शिवाजी शिंदे (१४) असे या मुलीचे नाव असून ती धारावीतल्या गणेश विद्या मंदिर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत होती. गेल्या काही दिवसांपासून तिला ताप येत होता. त्यामुळे तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचारदेखील सुरू होते. सोमवारी पहाटे तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला सायन रुग्णालयात दाखल केले. तपासणीत तिला डेंग्यूची लागण झाल्याचे समजताच डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात दाखल केले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी तिचा मृत्यू झाला. मोनिकाने नऊ दिवस नवरात्रीचा उपवासदेखील केला होता. त्यामुळे तिची प्रकृती अधिक खालावल्याने डेंग्यूला रोखणे अधिक कठीण झाले. त्यात तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)