Join us

धारावीचा स्कोअर १८ व्या वेळा शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:11 IST

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. तर काही विभागांमध्ये रुग्णवाढ दिसून येत आहे; मात्र समाधानाची बाब ...

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. तर काही विभागांमध्ये रुग्णवाढ दिसून येत आहे; मात्र समाधानाची बाब म्हणजे धारावीत मंगळवारी १८ व्या वेळा एकही बाधित रुग्ण सापडला नाही. सध्या या भागांत दहा सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

पहिल्या लाटेत जुलै २०२० नंतर धारावीत कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान धारावीतील इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा सर्वांची चाचणी सुरू केली. आतापर्यंत येथील ६६१३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. मागील काही दिवसांत काही विभागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जी उत्तर विभागांतर्गत असलेल्या माहीम आणि दादर विभागातही रुग्ण संख्या वाढली आहे; मात्र धारावीमध्ये अद्यापही कोरोनाचा प्रसार नियंत्रणात असल्याचे दिसून येते.

जी उत्तर विभागातील आजची स्थिती

परिसर...आजचे बाधित...एकूण रुग्ण...सक्रिय...डिस्चार्ज

धारावी...०.....७०३४....१०......६६१३

दादर....०४....१००६८...९२...९६७८

माहीम...१३...१०४२०...१४३....१००१६