Join us

विकासकामे मार्गी; टँकरपासून मुक्ती

By admin | Updated: March 8, 2015 22:49 IST

तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरीषद असताना सध्याच्या प्रभाग क्र. ५५ मधील बहुतांश विकासकामे झाली. तरीही गेल्या साडेचार वर्षात सुमारे १० कोटी रू.

दिपक मोहिते, वसईतत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरीषद असताना सध्याच्या प्रभाग क्र. ५५ मधील बहुतांश विकासकामे झाली. तरीही गेल्या साडेचार वर्षात सुमारे १० कोटी रू. विकासकामांवर खर्च करण्यात आला. यामध्ये पाथवे, रींगरूट, उद्याने, क्रीडांगण, रस्ते इ. विकासकामांचा समावेश आहे. महानगरपालिकेचा हा एकमेव प्रभाग आहे. त्या प्रभागामध्ये पाणीटंचाई जाणवत नाही. परीसराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्या या प्रभागात असल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असते.माजी नगराध्यक्ष नारायण मानकर व माजी नगराध्यक्षा राजेश्वर नारायण हे दोघे नगरपरीषद असताना प्रभागाचे प्रतिनिधीत्व करत असत, त्यामुळे या प्रभागातील जवळपास ९० टक्के विकासकामे मार्गी लागली. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वृंदेश पाटील हे निवडून आले. ओमनगर, कृष्णा टाऊनशीप इ. परीसर या प्रभागात समाविष्ट असून हा प्रभाग विकासकामांच्या बाबतीत सुदैवी असा प्रभाग आहे. मिश्र लोकवस्तीच्या या प्रभागात १० वर्षापूर्वी पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता रूंद नाले नव्हते. त्यामुळे परीसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहायचे. परंतु नाले रूंद झाले व ही समस्या मार्गी लागली. या प्रभागामध्ये ७ उद्याने, जलतरण तलाव, पाथवे इ. कामे झाली तर जिमखाना प्रस्तावित आहे. दैनंदिन साफसफाई ही कामेही वेळेवर होत असल्यामुळे रोगराईचा प्रसार नसल्याचा दावा स्थानिक नगरसेवक वृंदेश पाटील यांच्याकडून करण्यात येत असतो. पाणी पुरेशा प्रमाणात मिळत असल्यामुळे पाण्याचे टँकर या प्रभागात पहावयास मिळत नाहीत.