Join us  

पोर्ट ट्रस्टच्या ६०० एकर जमिनीचा होणार विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 7:00 AM

गेल्या अनेक दिवसांपासून प्रास्तावित असणाऱ्या मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील १,८०० एकर जमिनीपैकी ६०० एकर जमिनीचा विकास करण्यात येण्यात येणार आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रास्तावित असणाऱ्या मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील १,८०० एकर जमिनीपैकी ६०० एकर जमिनीचा विकास करण्यात येण्यात येणार आहे. ही जमीन विकसित करण्यासाठी केंद्रीय नौकावहन मंत्रालयाने मंजुरी दिल्याने, या जागेचाविकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्य सरकार व केंद्रीय नौकावहन मंत्रालयाकडे या जमिनीचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रलंबित होता. त्यावर निर्णय झाल्यानेया जमिनीचा विकास होण्यास वेग मिळण्याची शक्यता आहे. या ६०० एकर जमिनीची किंमत सुमारे ५० हजार कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.ही जमीन विकसित करण्यात येणार असून, निविदा प्रक्रियेमध्ये बोली जिंकणाºया विकासकांना मुंबई महापालिका व राज्य सरकारतर्फे पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या ठिकाणी उभारण्यात येणाºया व्यावसायिक व निवासी इमारतींद्वारे अतिरिक्त शुल्क महापालिका व राज्य सरकारला मिळेल, असा अंदाज अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र बनविण्याचा प्रयत्न!या ठिकाणाला पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. क्रुझ टर्मिनल, हॉटेल्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यटनवृध्दीसाठी प्रयत्न केले जातील. मुंबई पोर्ट ट्रस्टने गतवर्षी केंद्रीय नौकावहन मंत्रालयाकडे याबाबत विकास आराखडा पाठविला होता.सागरी पर्यटनवाढीसाठी हा प्रकल्प साहाय्यभूत ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. क्रुझ पर्यटनालादेखील प्रोत्साहन मिळेल, असे प्रयत्न सुरू आहेत. जल पर्यटनाकडे नागरिकांचा ओढा वाढावा, यासाठी विविध जगप्रसिद्ध क्रुझ मुंबईत येतील, अशी व्यवस्था करण्यात आली असून, विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. 

टॅग्स :मुंबई