मुंबई : साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी डासप्रतिबंधक उपाययोजना करण्याची ताकीद पालिकेने गेल्या आठवड्यात दिली होती. परंतु अद्यापही अनेक विकासक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेने ३२ बांधकामांना तत्काळ काम थांबविण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे डासांच्या उत्पत्तीचा धोका वाढला आहे़ विशेषत: बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याने आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे़ त्यामुळे पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने मुंबईतील २७४१ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस पाठवून डासप्रतिबंधक उपाययोजनांचा १० कलमी कार्यक्रम राबविण्याची ताकीद दिली होती. परंतु काही विभागांमध्ये पालिकेने केलेल्या पाहणीत अनेक बांधकामांच्या ठिकाणी डासांना पोषक वातावरण असल्याचे दिसून आले. यामध्ये मालाड आणि मालवणी परिसरातील बांधकामांचा सर्वाधिक समावेश आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत डासप्रतिबंधक उपाययोजना बांधकाम सुरू असलेल्या परिसरात पत्रे, पाण्याचे पिंप, हेल्मेट, घमेले या वस्तूंमध्ये पाणी साचून डासांच्या उत्पत्तीचा अड्डा बनणार नाही याची खबरदारी घेणे़ मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर घातलेल्या ताडपात्रीमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणे़इमारतीच्या बांधकाम परिसरामध्ये तळघर किंवा जमिनीच्या खाली असणाऱ्या परिसरामध्ये पावसाचे पाणी साचू नये, यासाठी अधिक क्षमतेचे पंप बसवून पाणी सातत्याने काढण्यात यावे़बांधकामाच्या ठिकाणी शौचालय, न्हाणीघर अशा जागांसाठी राखून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी त्वरित काढण्यात यावे़ मजुरांना डासप्रतिबंधक जाळ्या पुरविण्यात याव्यात़ बांधकामांच्या ठिकाणी डॉक्टर असावा़ मजुरांना हेल्थ कार्ड, नवीन आलेल्या मजुरांची मलेरियाविषयक रक्त चाचणी करण्यात यावी़या विभागातील बांधकामांना नोटीसपी उत्तर १९, एन ३, पी दक्षिण २, के पश्चिम २, सी १, एफ दक्षिण १, जी दक्षिण २, एच पश्चिम २.त्यापाठोपाठ घाटकोपर, गोरेगाव, अंधेरी, चिराबाजार, धारावी, दादर आणि वांद्रे ते सांताक्रूझ येथील बांधकामांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
डासप्रतिबंधक उपायांकडे विकासकांचा कानाडोळा
By admin | Updated: July 15, 2015 02:04 IST