पनवेल : विमानतळ बाधीत शेतकऱ्यांना २२.५ टक्के विकसीत भुखंड देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे विकसीत भुखंड देण्याबाबत सिडको प्रशासन प्रामाणिक नसल्याचे सांगत नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ शेतकरी संघर्ष समितीने बुधवारी पनवेल मधील मेट्रो सेंटर वर निषेध मोर्चा काढला. विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होवुन काळे झेंडे दाखवत सिडको विरोधात घोषणाबाजी केली . नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळासाठी मौजे पारगाव ,ओवळे , कुंडेवहाल , माणघर या गावांसह एकुण दहा गावांच्या जमिनी सिडकोने संपादीत केल्या आहेत . यानुसार शेतक-यांनी संमतीपत्र सादर केली आहेत. शासनामार्फत भुखंडाचा इरादापत्र वाटपाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत शेतक-यांनी हे इरादापत्र घेण्यास विरोध दर्शविला आहे . यापुर्वी याविषयी बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना २२.५ टक्के योजनेनुसार विकसीत भुखंडाचे इरादापत्र देण्याचे ठरले होते. मात्र जेथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणार होते त्या पुष्पकनगर मध्ये १०० टक्के भरावाचे काम झालेले नाही. तसेच रस्ते , गटार , वीज आदी सुविधाही पुरविल्या गेल्या नाहीत . यापुर्वीही सिडकोने १२.५ टक्के विकसित भुखंड देण्याबाबत दीरगांई केली आहे . ४० वर्ष होवुनही संपादीत केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही . आमच्याही बाबतीत तसे होता कामा नये म्हणून कागदोपत्री २२. ५ टकके विकसीत भुखंड न देता ते पुष्पकनगर दापोली येथे द्यावेत त्यानंतरच शेतकरी आपल्या जमिनीचा ताबा शासनाकडे देईल अशी भुमिका समितीने घेतलीयपनवेल मधील मेट्रो सेंटर क्रमांक १ मध्ये उपजिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देताना या समितीचे अध्यक्ष महेंद्र पाटील , उपाध्यक्ष शिवदास गायकवाड, संदेश घरत , प्रविण भोईर, रेश्मा मुंगाजी, जितेंद्र म्हात्रे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते .(प्रतिनिधी )
बाधितांना हवेत विकसित भूखंड
By admin | Updated: June 4, 2015 05:13 IST