Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर उत्तर विभागाने राबवले विकसित भारत संकल्प अभियान

By मनोहर कुंभेजकर | Updated: November 28, 2023 19:57 IST

पाचशे नागरिकांनी घेतला सहभाग घेतला

मुंबई-विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत आर उत्तर विभागामध्ये दहिसर लिंक रोड येथील संभाजीनगर येथे आज दुपारी चार ते आठ या दरम्यान शिबिर पार पडले. या शिबीरात पाचशे नागरिकांनी सहभाग घेतला व त्याचा लाभ घेऊन सरकारच्या योजनेचे कौतुक केले.

यामध्ये आयुष्यमान भारत योजना, वैद्यकीय तपासणी, पी एम स्व निधी अंतर्गत कर्जाचे अर्ज लाभार्थींकडून भरून घेणे, तसेच आधार कार्ड लिंक करणे, भारत पेट्रोलियम लिमिटेड यांच्या योजनांची माहिती नागरिकांना देणे, इत्यादी स्टॉल तेथे बसवण्यात आले होते. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा रहिवाशांना नागरिकांना लाभ मिळावा याची माहिती एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक आमदार  मनीषा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.परिमंडळ 7 च्या पालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनानुसार आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नयनिश वेंगुर्लेकर यांच्या मार्फत सदर शिबीर पार पडले. यावेळी आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त ललित तळेकर उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई