Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवनारची आगीतून सुटका नाही!

By admin | Updated: March 11, 2015 01:27 IST

नाक मुठीत घेऊन त्यांनी अनेक वर्षे काढली़ अधूनमधून दिसणारे आगीचे लोळही नित्याचेच़ डम्पिंग ग्राउंड परिसरात राहण्याची मोठी शिक्षाच देवनारचे

शेफाली परब-पंडित, मुंबईनाक मुठीत घेऊन त्यांनी अनेक वर्षे काढली़ अधूनमधून दिसणारे आगीचे लोळही नित्याचेच़ डम्पिंग ग्राउंड परिसरात राहण्याची मोठी शिक्षाच देवनारचे रहिवासी भोगत आहेत़ या आगीचा धूर महापालिकेच्या दरबारात अनेक वेळा पोहोचला़ कचरावेचकांवर संशय, रहिवाशांच्या आरोग्याबाबत चिंता, एखादी चौकशी समिती आणि फारफार तर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो़ कालांतराने अधिकारी कानावर हात ठेवत असल्याने देवनारचे रहिवासी कचऱ्याची दुर्गंधी आणि विषारी धुरात गुदमरत दिवस काढत आहेत़देवनार डम्पिंग ग्राउंडवर प्रत्येक महिन्याला सरासरी दहावेळा छोट्या-मोठ्या आगी लागण्याचे प्रकार घडत असतात़ गेल्या वर्षी मे आणि आॅक्टोबर महिन्यात मोठ्या आगी लागण्याच्या घटनाही घडल्या होत्या़ मात्र या आगीची तक्रार केल्यानंतरही पालिका अनेक वेळा दखल घेत नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे़ ओला व सुका कचरा एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याने या आगीतून निघणाऱ्या विषारी वायूमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य बिघडले आहे़ नुकतेच डम्पिंग ग्राउंड तळोजाला स्थलांतरित होण्याच्या खूशखबरीने देवनारच्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता़ मात्र, २६ फेब्रुवारीपासून कचऱ्याचे डोंगर पुन्हा पेटू लागले आहेत. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली़ परंतु आग नियंत्रणात आली तरी अजूनही थंड झालेली नाही़ त्यामुळे अधूनमधून रात्रीच्या वेळेस आग धुमसत राहते़