Join us  

खासगीकरणाला विरोध करणाऱ्यांना घेतले ताब्यात; सेंट्रल व वेस्ट्रन रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 4:26 AM

अहमदाबाद रेल्वे स्थानक येथे देशातील दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेसला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीयांनी हिरवा झेंडा दाखविला.

मुंबई : खासगी तेजस एक्स्प्रेसच्या विरोधात आंदोलन करणाºया रेल्वे कर्मचाºयांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. प्रत्येक स्थानकावर आणि स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा कडक पहार ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई ते अहमदाबाद पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस धावली. मात्र या खासगी एक्स्प्रेसच्या विरोधात सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आणि वेस्टर्न रेल्वे मजदूर संघ आंदोलन करण्याची आखणी केली होती. मात्र सुरक्षा व्यवस्थेने आंदोलन होऊ दिले नाही. स्थानकावर येणाºया रेल्वे कर्मचाºयांना पोलिसांनी मज्जाव केला. अहमदाबादाला, बडोदा आणि सुरत येथील १०० ते १५० रेल्वे कर्र्मचाºयांना एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन तासांनी त्यांची सुटका करण्यात आली, अशी माहिती संघाच्यावतीने देण्यात आली.पहिल्याच दिवशी तक्रारीतेजस एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यामधील ट्यूब लाईटचे कव्हर पडले. यासह अचानकपणे होणाºया मोठ्या आवाजाच्या उद्घोषणेने प्रवाशांची डोकेदुखी झाली. एक्झिक्युटिव्ह श्रेणीतील डब्यामध्ये प्रवाशांसाठी ‘मुव्हींग टॉकिज बॉक्स’ उघडत नव्हते. त्यामुळे देखील अडचणी येत होत्या. दरम्यान रेल्वे दुरूस्ती कर्मचाºयांनी कव्हरची आणि ‘मुव्हींग टॉकिज बॉक्स’ तपासणी करून पूर्वरत केले.तिकिट दर लवचिकसध्या खासगी तेजस एक्स्प्रेसचे तिकिट दर चेअर कार डब्यासाठी १ हजार ६५९ आणि एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यामधील २ हजार ५४७ आहे. मात्र हे तिकिट दर सणासुदी आणि सुट्टीच्यावेळी वाढणार आहेत. भारतीय रेल्वेप्रमाणे तिकिट दर नसणार आहेत. यासह या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना कोणत्याही सवलती देण्यात आल्या नाहीत. मात्र परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित जागा ठेवण्यात आली आहे.तेजस एक्स्प्रेसमध्ये ‘हॅप्पी बथडे’आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करणाºयासाठी अनेकजण वेगवेगळ््या शक्कला लढवितात. त्याचप्रमाणे तेजस एक्स्प्रेसच्या टिमने प्रवाशांना जवळचे मानले व त्यांचा वाढदिवस साजरा केला. प्रवासात गौरी राजे, रोहित चौडवाडीया आणि एच. भावेश यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. प्रवाशांचे वाढदिवस खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये साजरे करण्यात येत आहेत. उद्घोषणेद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येतील. यासह त्यासाठी वाढदिवसाचा केक कापून सेलिब्रेशन केले जाईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालयन यांनी सांगितले. पहिले पुरूषामध्ये ज्येष्ठ नागरिक तिकीट धारक पी. व्ही. सवाणूर , पहिले महिलामध्ये तिकीट धारक असलेले ज्येष्ठ नागरिक गेना मडीनाब, पहिले पुरूष तिकीट धारक सन्नी श्याम, पहिल्या महिला तिकीट धारक रेणू कुशवाह यांना आयआरसीटीसीकडून भेटवस्तू देण्यात आली.रेल्वेमंत्र्यांची तेजस एक्स्प्रेसच्या ‘ट्रिप’ला दांडीखासगी तेजस एक्स्प्रेसची संकल्पना रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसी यांच्याद्वारे मांडण्यात आली. यांच्याद्वारे खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहे. अहमदाबाद येथील अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेसच्या उद्घाटनीय फेरीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल येणार होते. मात्र त्यांचे येणे ऐनवेळेला रद्द झाले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ऐनवेळी ‘प्लॉन’ रद्द केल्याने सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधाण आले. गोयल न आल्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.पहिल्या दिवशी ७३६ जणांचा प्रवासतेजस एक्स्प्रेसमध्ये ७३६ जणांनी प्रवास केला. या एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक डब्यात तीन रेल्वे सुंदरी होत्या. तर, संपूर्ण एक्स्प्रेसमध्ये ५ सुरक्षा रक्षक होते. तीन डब्यांना एक कॅटरिंग प्रमुख, दोन डब्यासाठी एक सफाईवाला, ६ तिकिट तपासक होते. यासह रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात होते.शेअर वाढलाआयआरसीटीसीने दुसरी खासगी एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी आयआरसीटीसीचा बाजारभाव १८ टक्क्यांनी वाढून १०२२ रुपयांपर्यंत स्थिरावला.

१०० कोटींची तेजस एक्स्प्रेसदेशातील दुसरी तेजस एक्स्प्रेस तब्बल १०० कोटी रुपयांची आहे. या एक्स्प्रेसच्या एका डब्याची किंमत १० कोटी रुपये आहे. तर, एक दरवाजा १० लाखांचा आहे. या एक्स्प्रेसमधील शौचालय अत्याधुनिक आहेत. शौचालयाचे नळ देखील १० ते १२ हजार रुपयांचे नामांकित कंपनीचे आहेत.ले ले सेल्फी ले लेतेजस एक्स्प्रेस सोबत प्रत्येक प्रवासी सेल्फी काढण्यात गुंग झाला होता. एक्स्प्रेस प्रत्येक ठिकाणी बसून वेगवेगळे हावभाव करून सेल्फी काढण्यात आल्या. यासह प्रत्येक रेल्वे स्थानकातून तेजस एक्स्प्रेस जात असताना बाहेरील प्रवासी देखील एक्स्प्रेस फोटो काढत होते.गुजरात-महाराष्ट्राचा दुवाअहमदाबाद रेल्वे स्थानक येथे देशातील दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेसला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणीयांनी हिरवा झेंडा दाखविला. अहमदाबाद आणि मुंबई हे दोन्ही आर्थिक केंद्र आहेत. या दोन केंद्राना खासगी तेजस एक्स्प्रेस जोडणार आहे. देशातील दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस गुजरात आणि महाराष्ट्राला आर्थिक आणि सामाजिक बाबींचा दुवा आहे. खासगी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या प्रवासाला वेग येणार आहे. यासह देशामध्ये वायफाय, स्वच्छ स्थानक बनविण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ११८ ट्रेन वेगवेगळ््या मार्गावर सुरू करण्यात आले आहेत, असे वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले.

टॅग्स :तेजस एक्स्प्रेस