Join us

नव्या पिढीर्पयत ‘पु.ल.’ पोहोचविण्याचा ध्यास

By admin | Updated: November 10, 2014 22:27 IST

पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले.

मुंबई :  पुलंचे साहित्य नव्या पिढीर्पयत पोहोचविण्यासाठी त्यातला काळ बदलून आशय पोहोचविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यायचा मानस असल्याचे अतुल परचुरे यांनी सांगितले. पु.ल. युवा महोत्सवादरम्यान, रविवारी युवा गुणवंतांशी गाणी-गप्पा आणि मुलाखतींच्या स्वरूपात संवाद साधणारा कार्यक्रम सादर झाला. 
या कार्यक्रमात गायक मंगेश बोरगावकर, वैशाली माडे, नंदेश उमप, संगीतकार मिलिंद जोशी, अतुल परचुरे, मानसशास्त्रज्ञ गौरी 
कोठारी आणि दिग्दर्शिका समृद्धी पोरे सहभागी झाल्या. तसेच, या महोत्सवात नॅश नोबार्ट आणि दीपिका भिडे यांची मैफीलही सादर झाली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा शिष्य असलेल्या नॅश नोबार्टचे प्रयोगशील बासरीवादन प्रशंसेचा विषय 
ठरले, त्याच्या बासरीवादनाने अवघे आसमंत प्रसन्न झाले. त्याचबरोबर अखंड रियाझ असलेल्या दीपिकाचा स्वर इतका पक्का आहे की, हे 
डोळे मिटले तर समोर केवळ 22 
वर्षाची गायिका गाते आहे असे वाटणारच नाही, याचा 
प्रत्ययही उपस्थित रसिकांना आला. (प्रतिनिधी)
 
1पु.ल. युवा महोत्सवाच्या दुस:या दिवशी काटरूनिंग, व्यंगचित्र, चित्रकला आणि कॅलिग्राफी या विविध कलांच्या कार्यशाळांनी धम्माल उडवून दिली. मुंबईकर कलाप्रेमींनीही सकाळपासूनच या कार्यशाळांसाठी गर्दी करीत आपल्या कलेवरच्या प्रेमाचा जणू दाखलाच दिला. लहानग्यांपासून अगदी साठीच्या आजी-आजोबांनीही या कार्यशाळांना हजेरी लावून उत्साहात विविध कलांचे धडे गिरवले.
2विद्याथ्र्याचा उत्साह पाहत सकाळपासून तज्ज्ञ मार्गदर्शकांनीही संध्याकाळी उशिरार्पयत कलाशिक्षण जोमाने सुरू ठेवले. कलेच्या कार्यशाळांचा शुभारंभ काटरूनिंग या कलेने झाला. या कार्यशाळेत व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी उपस्थित सर्वच वयोगटातील विद्याथ्र्याना काटरूनिंगचे धडे दिले. केवळ थिअरीच नव्हेतर, उपस्थित विद्याथ्र्यापैकी एका आजोबांना आमंत्रण देत त्यांचे ‘लाईव्ह पोट्रेट’ही साकारले. 
3सभागृहातील उपस्थित कलाप्रेमींसाठी ही अनोखी पर्वणीच ठरली. काटरूनिंगच्या कलेसाठी प्रथम निरीक्षण करणो गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.काटरूनिंगसोबतच चित्रकला आणि कॅलिग्राफी या कार्यशाळांनाही विद्याथ्र्यानी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. बच्चे कंपनीसाठी काटरून्स नेहमीच अव्वल पसंती असल्याने त्यांनी याचा भरपूर आस्वाद घेतला.