Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिझाइनच्या छत्र्या, रेनकोटचा बाजारात पाऊस

By admin | Updated: June 14, 2015 22:43 IST

या वर्षातील पावसाळ्यासाठी विविध आकारांच्या व रंगांच्या छत्र्या आणि रेनकोट बाजारात आले आहेत. यात छत्री १०० पासून ८०० रुपयांपर्यंत तर रेनकोट २००

भाग्यश्री प्रधान, ठाणेया वर्षातील पावसाळ्यासाठी विविध आकारांच्या व रंगांच्या छत्र्या आणि रेनकोट बाजारात आले आहेत. यात छत्री १०० पासून ८०० रुपयांपर्यंत तर रेनकोट २०० पासून ४ हजार रुपयांपर्यंतच्या दराचे उपलब्ध आहेत. विकले जात आहेत. यात देशी मेडसह चायना मेड छत्र्यांसह रेनकोटचा समावेश आहे.ऋतू बदलला की, त्यानुसार खरेदी केली जाते. पावसाळा आला की दरवर्षी छत्री, रेनकोट, चप्पल आदी गोष्टी बाजारात विकायला सज्ज होत असतात. या वर्षी लहान मुलांमध्ये फेमस असणाऱ्या कार्टून्सचे डिझाइन आता छत्र्या आणि रेनकोटवरही दिसू लागले आहेत. मुलांनी डोरेमॉन, स्पायडरमॅन तर मुलींनी बार्बी डॉलची डिझाइन असणाऱ्या छत्र्यांना पसंती दिली आहे. मोठ्यांसाठीही टू-फोल्ड, थ्री-फोल्ड पद्धतीच्या छत्र्या बाजारात विकायला आल्या आहेत. यातील काही छत्र्यांना झालर लावून सजविण्यात आले आहे, तर काहींवर फुलांचे नक्षीदार डिझाइन प्रिंट केले असून काही छत्र्या प्लेन असल्या तरी विविध रंगांत उपलब्ध आहेत. पाण्यापासून दप्तर सुरक्षित ठेवणाऱ्या रेनकोटमध्येही विविध रंग आणि डिझाइन असल्यामुळे लहान मुलांमध्ये ते घेण्याचे प्रमाण जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मोठ्या माणसांमध्येही पावसाळा आणि थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ‘टू-सीझन इन वन रेनकोट’ अशी खरेदी केली जात आहे.