Join us

जिल्हा पाहणीसाठी उपमुख्यमंत्री पवार आज पालघरमध्ये

By admin | Updated: June 30, 2014 23:12 IST

नव्याने निर्माण होणा:या कार्यालयांची, इमारतीची व इतर सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या पालघर येथे उपस्थित राहणार आहेत.

पालघर :  पालघर जिल्हय़ाच्या घोषणोनंतर नव्याने निर्माण होणा:या कार्यालयांची, इमारतीची व इतर सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या पालघर येथे उपस्थित राहणार आहेत.
पालघर जिलची नव्याने घोषणा झाल्यानंतर राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी पालघरला भेट देत पालघर न्यायालयासमोरील सेलटॅक्स विभागाची नव्याने उभी राहत असलेली इमारतीला प्राधान्य दिले होते. 1 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणा:या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यालय अधिकारी व जिल्हापोलीस अधिक्षक कार्यालये या इमारतीत सुरू करण्यात हरकत नसल्याचा अहवाल त्यांनी शासनाकडे पाठविल्याचे कळते. त्या अनुषंगाने उद्या सकाळी 9 ते 9.3क् च्या सुमारास उपमुख्यमंत्र्यांचे हॅलीकॉप्टर आर्यन ग्राऊंडवर उतरविण्यात येणार आहे. 
त्यासाठी हॅलीपड तयार करण्यात आले असून त्यांच्यासोबत पालकमंत्री गणोश नाईक, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार आनंद ठाकूर इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनानंतर प्रथम सर्व इमारतींची पाहणी केल्यानंतर 1क् ते 11 वा. च्या दरम्यान प्रमुख अधिका:यांची बैठक घेण्यात येणार आहे.  (वार्ताहर)