Join us

संतोष रस्तोगी यांची महाराष्ट्र सदनात प्रतिनियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 01:42 IST

अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले.

मुंबई : गेल्या वर्षापासून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाची धूरा सांभाळत असलेल्या पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले.रस्तोगी यांनी दिल्लीत प्रतिनियुक्तीसाठी विनंती केली होती.त्यानुसार बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लवकरच अन्य आधिकार्याची नियुक्ती केली जाईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. रस्तोगी हे गेल्यावर्षी 19 मे पासून क्र ाईम ब्रॅचमध्ये कार्यरत होते. गॅगस्टर एजाज लकडावाला याला खंडणी प्रकरणी अटकेची महत्वपूर्ण कामिगरी विभागाने त्यांच्या नेतृत्वाखालील केली आहे. क्र ाईम ब्रॅचपूर्वी वर्षभर ते प्रशासन शाखेत आण ित्यापूर्वी राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत होते. केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागात (सीबीआय) दिल्लीत प्रतिनियुक्तीवर काम केले.