मुंबई महापालिकेचा फतवा : घरात डासांच्या अळ्या सापडल्यास घरमालकावर कारवाई
मुंबई : डेंग्यूचा फैलाव रोखण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई महापालिकेने याचे खापर मुंबईकरांवर फोडले आह़े त्यानुसार असे आजार पसरविणा:या डासांच्या अळ्या घरात सापडल्यास घरमालकावर जेलमध्ये डास मारण्याची वेळ येईल, असा अजब फतवाच प्रशासनाने काढला आह़े याकडे दुर्लक्ष करणारे विभाग अधिकारीही पालिकेच्या रडारवर असणार आहेत़
पालिकेच्या केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे डेंग्यूच्या बळी ठरल्याचे तीव्र पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज उमटल़े धूरफवारणी नियमित होत नाही, खाजगी रुग्णालये डेंग्यू रुग्णांचा आकडा देत नाहीत, आरोग्य खाते निवडणूक डय़ुटीवर असल्याने डेंग्यू वाढला, स्वच्छतेचा बोजवारा उडाला, असा हल्लाच सदस्यांनी चढविला़ याबाबत खुलासा करताना घराघरांमध्ये साठवलेल्या पाण्यातच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ़ सुहासिनी नागदा यांनी केला़ अशा सोसायटय़ांना आतार्पयत कोर्टात खेचले जात होत़े यापुढे पालिकेच्या तपासणीत घरामध्ये डासांच्या अळ्या सापडल्यास संबंधितांना अटक करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केल़े (प्रतिनिधी)
आतार्पयतची कारवाई
डेंग्यूचा धोका वाढत असतानाही
उत्तुंग इमारती आणि उच्चभ्रू वसाहतींमध्ये
डास प्रतिबंधक खबरदारी घेतली जात नाही़
उच्च लोकवस्तींचा निष्काळजीपणा
उघड झाल्यानंतर निवासी सोसायटय़ांना कोर्टात खेचण्यास पालिकेने सुरुवात केली़
येथे होते डासांची पैदास
प्लास्टीकचे कप, टायर, गॅलेरीत टाकलेल्या अडगळीच्या सामानात साचलेले पाणी, लादी पुसल्यानंतर काही ठिकाणी साचून राहणारे पाणी, फेंगशुई व शोभेच्या वस्तूंमध्ये साठवलेले पाणी व बाटल्यांमध्ये या डासांची पैदास होत़े