Join us
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू डासांचे घरांमध्येच अड्डे

By admin | Updated: November 13, 2014 01:17 IST

मुंबईत पालिकेमार्फत सुरू असलेली धूरफवारणी परिणामकारक आह़े परंतु डेंग्यू डासांचे 92 टक्के अड्डे घरांमध्येच आहे,

मुंबई :  मुंबईत पालिकेमार्फत सुरू असलेली धूरफवारणी परिणामकारक आह़े परंतु डेंग्यू डासांचे 92 टक्के अड्डे घरांमध्येच असल्याचे स्पष्टीकरण देत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी बनावट कीटनाशकाच्या वापराचा भाजपाचा आरोप अप्रत्यक्षपणो फेटाळला़ आरोग्य विभाग चांगले काम करीत असताना असे आरोप करणो त्याच्यावर अन्याय ठरेल, असेही त्यांनी सुनावल़े
नगरसेवकांचा डेंग्यूचा तास घेणा:या आरोग्य विभागाला विरोधी पक्षांनी आज फैलावर घेतल़े प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मुंबईत डेंग्यूचे थैमान  सुरू असल्याचा हल्ला विरोधकांनी चढवला़ मात्र वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाच्या संचालिका डॉ़ सुहासिनी नागदा यांनी जुनाच पाढा वाचला़ यामुळे स्थायी समिती सदस्यांचे पित्त खवळल़े आरोग्य खाते नापास झाले आहे, अधिका:यांचे राजीनामे घ्या, पैसे कमविण्यासाठी बनावट फवारणी सुरू, असे आरोप सदस्यांनी केल़े यावर स्पष्टीकरण देताना अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी अधिका:यांची बाजू उचलून धरली़ आरोग्य शिबिर, प्रभावी धूरफवारणी, घरोघरी तपासणी सुरू आह़े मात्र सप्टेंबर महिन्यात 85 टक्के आणि गेल्या महिन्यात 92 टक्के डेंग्यू डासांचे अड्डे लोकांच्या घरात सापडल़े घराघरात फवारणी करणो अशक्य असल्याचे त्यांनी सुनावल़े (प्रतिनिधी)
 
च्गेल्या वर्षी डेंग्यूचे 927 रुग्ण आढळून आल़े, तर 12 जणांचा मृत्यू झाला होता़ या वर्षी आतार्पयत 7क्क् रुग्ण आढळले असून, 1क् जणांचा मृत्यू झाला आह़े
च्प्रत्येक महिन्यात पालिकेचे कर्मचारी 1क् लाख घरांची तपासणी करून डेंग्यूचे डास अथवा रुग्ण आढळल्यास खबरदारी घेत असल्याचा दावा प्रशासनाने केला़ 
च्दमट हवामानात घट होत नसल्यामुळे डासांचे प्रजनन व डेंग्यू कमी होताना 
दिसत नाही, असे डॉ़ सुहासिनी नागदा यांनी सांगितल़े
च्दरवर्षी पालिका कीटकनाशक फवारणीसाठी दोन लाख 57 हजार लीटर तेल घेत़े मात्र यासाठी पालिका प्रतिलीटर 1,1क्क् रुपये मोजत असून, गुजरातमध्ये हा दर 9क्क् रुपये असल्याचे भाजपाने निदर्शनास आणल़े
 
महापौरांच्या विधानाचे तीव्र पडसाद
प्रसारमाध्यमांनी डेंग्यू या साध्या आजाराला भयंकर 
रूप दिल्याची मुक्ताफळे उधळणा:या मुंबई महापालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडल़े महापौर या आजाराविषयी गंभीर नाहीत़ लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला़ मात्र रुग्णांमधील भीती कमी करण्यासाठी महापौरांनी असे विधान केल्याची सारवासारव सभागृह नेत्या 
तृष्णा विश्वासराव यांनी केली़ 
 
1परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये ‘स्वच्छ भारत अभियान, स्वच्छता मनापासून.. शहरार्पयत’ असा मोठा फलक लावण्यात आला असून, त्यावर स्वाक्ष:या घेतल्या जात आहेत. याच फलकावर दुरुस्तीच्या कामामुळे डाग पडले असून फलकाच्या समोरच सिमेंटची गोणी, फावडे ठेवलेले आहे. 
2रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. मोठय़ा प्रमाणावर भंगार सामान काढून टाकण्यात आले. मात्र ही साफसफाई फक्त दर्शनी भागातच करण्यात आल्याचे रुग्णालय परिसरात फिरल्यावर लक्षात येते. 
3रुग्णालयातील त्वचा, महिला आणि बालक वॉर्डाच्या पाठीमागे, शवविच्छेदन केंद्राच्या परिसरात अजूनही पाणीगळती सुरूच आहे. एका ठिकाणी पाइपमधून वाहणारे पाणी थेट टाकीमधून येत असल्याचे आढळले. ते साचून राहते. स्वच्छता मोहीम राबवूनही केईएममध्ये अजूनही डासांची पैदास होणारी ठिकाणो दिसत असल्यामुळे काही निवासी डॉक्टरांनी गाशा गुंडाळला आहे.