पूजा दामले - मुंबई
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वाढलेले डेंग्यूचे थैमान नोव्हेंबरच्या अखेरीस थंडावेल. पुढल्या महिन्यात शहरात डेंग्यूचा ताप नावापुरता उरेल, असा दावा प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांनी लोकमतकडे केला. नागदा यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबरअखेर्पयत डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी घसरेल. तर डिसेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे फक्त 14 ते 15 रुग्ण आढळतील.
थंडी पडल्यावर डेंग्यूच्या डासांची पैदास कमी होणार होती. मात्र अवकाळी पावसाने थंडीला ब्रेक देऊन उकाडा निर्माण केला. सोबत डेंग्यू डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण केले. सर्वच शासकीय यंत्रणांकडून जनजागृतीसोबत डासांची उत्पत्ती रेाखण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे डेंग्यूला खीळ बसली आहे. येत्या काही दिवसांत निसर्गाचे चक्र फिरून थंडी पडेल, असा विश्वास नागदा यांनी व्यक्त केला.
जानेवारी महिन्यापासून आढळलेल्या रुग्णांची संख्या आणि संघटनेद्वारे दिली गेलेली संख्या यांच्यामधल्या तफावतीचा अभ्यास करून डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला आहे की, या वर्षी जानेवारी
महिन्यात डेंग्यूचे प्रमाण वाढले होते. यानंतर काहीसा आटोक्यात आलेला डेंग्यू सप्टेंबर महिन्यात उफाळून वर आला. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 167 रुग्ण आढळून आले होते.
ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 2क्4 वर गेली. मात्र, संघटनेच्या अंदाजानुसार या दोन महिन्यांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 145 आणि 186 रुग्ण आढळून येतील.
साधारणत: जुलै, ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. मात्र, सप्टेंबर महिन्याअखेरपासून डेंग्यू कमी होण्यास सुरुवात होते. यंदा पाऊसही उशिरा सुरू झाला आणि याचबरोबरीने थंडीही नोव्हेंबरचा दुसरा आठवडा उजाडूनही पडलेली नाही. हवामानातील एकूण झालेल्या बदलांमुळे डेंग्यूच्या फैलावामध्येही बदल दिसून आले आहेत, असे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
रुग्णांना मच्छरदाण्यांचा आधार
परळ येथील महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होताना आढळल्यामुळे त्यांना पालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. अस्वच्छतेमुळे या रूग्णालयात डासांची प्रमाण वाढले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने परिसराची स्वच्छता केल्याचे जाहीर केले होते. मात्र, येथील पाइपलाइनमधून अजूनही पाणी गळत असल्यामुळे आता रुग्ण डेंग्यूच्या डासांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मच्छरदाणी वापरत आहेत. रुग्णालयाच्या त्वचा विभागात हे चित्र मोठय़ा प्रमाणात दिसून येते.
च्‘बुंदों से जैसे सागर बने, बुंदों में वैसेही मच्छर पले’ यासह घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नका, असा संदेश देत महापालिका डेंग्यू रोखण्यासाठी जाहिरातींचा वापर करीत आहे. तर दुसरीकडे काही कंपन्यादेखील आता त्यांचा उत्पादनांचा खप वाढण्यासाठी ‘डेंग्यूच्या डासांपासून संरक्षण मिळवा’ अशा थेट जाहिराती करताना दिसून येत आहेत.
च्आधी फक्त डासांना मारणारे स्प्रे, डासांपासून बचाव करणारी क्रीम्स अशा जाहिराती होत होत्या. पण आता हीच उत्पादने डेंग्यू टाळण्यासाठी ‘संरक्षक उत्पादने’ बनली आहेत. जाहिरातींचा मुख्य हेतू हा लोकांचे लक्ष वेधून घेणो हा असतो. ते अशा पद्धतीने आपला हेतू साध्य करत आहेत.
एखादा आजार महामारी म्हणून केव्हा घोषित करावा याचे मापदंड जागतिक आरोग्य संघटनेद्वारे दिले जातात. संघटना गेल्या 5 वर्षाचा अंदाज घेऊन ही आकडेवारी जाहीर करते. याचा आधार घेऊन महापालिकेच्या डॉक्टरांनी एक आलेख तयार केला आहे. या आलेखावरून तयार करण्यात आलेला अहवाल शुक्रवारी अतिरिक्त आयुक्तांकडे दिला आहे. या आलेखावरून असे स्पष्ट दिसून येते की ऑक्टोबर अखेरपासून डेंग्यूचे रुग्ण घटण्यास सुरुवात झाली आहे.