Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्त ढाकणे यांच्या निलंबनासाठी निदर्शने

By admin | Updated: July 9, 2015 01:47 IST

महापालिका उपायुक्त रणजित ढाकणे यांचे निलंबन होईपर्यंत आर मध्य विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे़

मुंबई : महापालिका उपायुक्त रणजित ढाकणे यांचे निलंबन होईपर्यंत आर मध्य विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडले आहे़ या कर्मचाऱ्यांनी आज तीव्र निदर्शने केली. आयुक्तांच्या आश्वासनानंतर अभियंत्यांनी आंदोलन स्थगित केले़ बोरीवली येथील कर्मचारी विजय मानकर यांना मारहाण झाली होती़ तसेच साहाय्यक अभियंता रमेश चौबे यांना मारहाणीचा प्रयत्न व आर मध्य विभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांचा ढाकणे यांनी अवमान केल्याने अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने सोमवार मध्यरात्रीपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता़ मात्र अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी अहवाल सादर केला असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.