Join us

जोगेश्वरीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:44 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जोगेश्वरीत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित दोन हजार नागरिकांनी निदर्शने केली.

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जोगेश्वरीत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित दोन हजार नागरिकांनी निदर्शने केली. माजी नगरसेवक चंगेज मुलतानी यांच्या नेतृत्वाखाली सबरी मशिदीजवळील इरफान बेग चौकातून निघालेल्या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे चंगेज मुलतानी यांनी सांगितले. या कायद्या विरोधात नागरिकांनी फलक फडकवत व घोषणाबाजी करत जोरदार निषेध केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर म्हणाले की, या कायद्यामुळे समाजात दरी निर्माण होणार असून, गरिबांचे मोठे नुकसान होणार आहे. या रॅलीत युनायटेड वेल्फेअर अँड एज्युकेशन फेडरेशनसह अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत गफूर खान, नसीम सिद्धीकी, यासिन चौधरी, रमाशंकर यादव, समी खान, झाकीर शेख यांनी मत मांडले.

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयकराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी