Join us

चिपळूण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मागणी -

By admin | Updated: September 16, 2014 23:24 IST

प्रकाश पवार : कार्यालय नसल्याने वाहनमालकांची गैरसोय

चिपळूण : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. चिपळूण येथे कार्यालय नसल्याने चालक परवाने व तत्सम कामासाठी वाहन चालकांना रत्नागिरीला जावे लागते. त्यामुळे चिपळूणसाठी कार्यालयाने चालक परवाने वितरणाचा कोटा वाढवावा अशी मागणी खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी केली आहे. उत्तर रत्नागिरी विभागातील वाहनधारकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने रत्नागिरीप्रमाणे दर आठवड्याला २५० शिकावू चालक परवाने द्यावेत अशी मागणी खेर्डी येथील पवार यांनी केली आहे. चिपळूण येथे दर सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे चालक परवाने दिले जातात. यासाठी मंडणगड, दापोली, खेड व गुहागर या ५ तालुक्यातील वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दुचाकी वाहन चालकांची चाचणी गुहागर बायपास मार्गावर तर चारचाकी व अवजड वाहन चालकांची चाचणी खेर्डी औद्योगिक वसाहतीत घेण्यात येते. दुचाकी आणि तीन चाकी स्वारांची संख्या जास्त असते. आठवड्याला केवळ १०० दुचाकी वाहन चालकांना शिकावू चालक परवाने देण्यात येतात. २०० हून अधिक वाहन चालक या परवान्यासाठी चिपळूणला येत असतात. त्यामुळे अन्य वाहन चालकांना निराशेपोटी परत जावे लागते. त्यासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विचार व्हावा अशी मागणी होत आहे. या मागणीचा विचार करून चिपळूण येथ ेउपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)गेल्या अनेक वर्षांची मागणी रखडल्याने नाराजीदर आठवड्याला हवेत २५० शिकाऊ चालक परवानेपाच तालुक्यातील चालकांची दर सोमवारी होते चिपळुणला गर्दी वाहनांची चाचणी बायपास व खेर्डी येथे कधी कधी निराशा पदरात पडते व कामे होण्यास लागतो विलंब आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो