Join us

जातपडताळणी समित्या बंद करण्याची मागणी

By admin | Updated: August 19, 2015 01:28 IST

मराठा समाज ओबीसी समाजाची खोटी दाखले घेऊन ओबीसी आरक्षणावर कब्जा करू लागले आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाकडे आल्या

मुंबई : मराठा समाज ओबीसी समाजाची खोटी दाखले घेऊन ओबीसी आरक्षणावर कब्जा करू लागले आहेत. या संदर्भातील अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाकडे आल्या. म्हणून महाराष्ट्र शासनाने २००३ सालापासून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबरोबर शैक्षणिक व नोकऱ्यांमध्येही जाचक अटी टाकून जातपाडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे या समाजाचे नुकसान होत आहे. याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक त्रास ओबीसी समाजाला भोगावा लागत आहे. ओबीसी समाजांतर्गत समाविष्ट आसलेले ओबीसी एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी या जाती-जमातींना शैक्षणिक व नोकऱ्यांसाठी बंधनकारक आसलेली जातपडताळणी आणि असंवैधानिक क्रिमीलेयरची अट काढून टाकण्यात यावी, अशी मागणी ओबीसी एनटी पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे महाराष्ट्र सरकारकडे केली. (प्रतिनिधी)