Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्याकडे खंडणीची मागणी

By admin | Updated: June 2, 2016 01:53 IST

शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात वीरा ही भूमिका करणारे, व्यायामशाळा प्रशिक्षक आणि माजी मिस्टर इंडिया संजीव चड्डा यांनी खार पोलिसांत एका इसमाविरोधात खंडणी

मुंबई : ‘शूटआऊट अ‍ॅट वडाला’ या चित्रपटात वीरा ही भूमिका करणारे, व्यायामशाळा प्रशिक्षक आणि माजी मिस्टर इंडिया संजीव चड्डा यांनी खार पोलिसांत एका इसमाविरोधात खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी शनिवारी खार पोलिसांनी एकाला अटक केली. दयाशंकर यादव (३४) असे अटक आरोपीचे नाव असून, तो माहीम येथे राहतो.खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात चड्डा यांची व्यायामशाळा आहे. ही व्यायामशाळा अनधिकृत असून, या प्रकरणी पालिकेला तक्रार करून ती बंद पाडेन, अशी धमकी यादव हा चड्डा यांना देत होता. त्यानुसार चड्डा यांनी त्याला भेटण्यासाठी बोलावले. त्या वेळी यादवने त्यांच्याकडे एक लाखाची मागणी केली. यावरून या दोघांमध्ये वाद झाला. या वादात यादवने चड्डा यांच्यावर हात उगारला, असे सूत्रांनी सांगितले. हीच बाब त्याच परिसरातून जाणाऱ्या खार पोलिसांच्या एका पथकाने पाहिली आणि त्यांनी या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. महत्त्वाचे म्हणजे चड्डा यांनी संभाषणाचे रेकॉर्डिंग केल्याने यादव याचे पितळ पोलिसांसमोर उघड झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी यादव याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)