Join us  

टॅक्सीचे किमान भाडे आठ रुपयांनी वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 2:20 AM

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली

मुंबई : टॅक्सीच्या किमान भाड्यात तब्बल ८ रुपयांनी वाढ करण्यात यावी अशी मागणी टॅक्सी टॅक्सीमेन्स संघटनेने केली आहे. संघटनेचे जनरल सेक्रेटरी ए. एल. क्वाड्रोस यांनी याबाबत पत्र त्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. गेल्या वर्षी २१ जून रोजी टॅक्सी संघटनेने परिवहन मंत्र्यांकडे किमान भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर राज्य सरकाराने कोणताही निर्णय घेतला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २०१५ साली टॅक्सीचे किमान भाडे २१ रुपयांवरुन २२ रुपये करण्यात आले होते. यानंतर सीएनजीच्या भाड्यामध्ये किमान ५ वेळा वाढ करण्यात आली. टॅक्सी भाववाढीबाबत खाटुआ समितीने राज्य सरकारला प्रत्येक किलोमिटरमागे एक रुपये या दराने टॅक्सीचे दर पुन्हा एकदा जाहीर करण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र सरकारने या अहवालावर अद्याप कोणतही पाऊल उचललेले नाही. सध्या सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे २२ रुपयांमध्ये टॅक्सी चालवणे शक्य नसून किमान भाडे ३० रुपये करण्याची मागणी टॅक्सीमेन संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

टॅग्स :टॅक्सीउच्च न्यायालयदिवाकर रावते