Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारघर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आरक्षणाची मागणी

By admin | Updated: August 25, 2014 00:58 IST

खारघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण खिडकी सुरू करावी, अशी मागणी पनवेल प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

नवी मुंबई: खारघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण खिडकी सुरू करावी, अशी मागणी पनवेल प्रवासी संघाच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघाच्या वतीने मध्य रेल्वेकडे अलीकडेच एक निवेदन देण्यात आले आहे.पनवेल स्थानकात तिकिटाच्या आरक्षणासाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे दलालांचा सुळसुळाट झाला आहे. दलालांच्या दादागिरीमुळे तासन्तास रांगेत उभे राहूनही अनेकदा तिकीट मिळत नाही. तर अनेकदा रांगेतल्या प्रवाशांना बाहेर काढले जाते, अशी तक्रार नॉर्थ इंडियन रहिवासी संघाने प्रवासी संघाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर खारघर रेल्वे स्थानकात परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करावी,अशी मागणी प्रवासी संघाने केली आहे. (प्रतिनिधी)