Join us

सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची मागणीला मिळाली गती

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 3, 2025 13:13 IST

सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’च्या स्थापनेच्या  मागणीला आता मिळणार आहे.

मुंबई - सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’च्या स्थापनेच्या  मागणीला आता मिळणार आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेच्या संवर्धन व वृद्धीगतासाठी ‘सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्याची खासदार शिंदे सेनेचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. या मागणीचा प्रस्ताव त्यांनी संबंधित विभागाकडे पाठवला असल्याचे आपल्याला पत्राद्वारे कळवल्याचे खा. वायकर यांनी लोकमतला सांगितले.

तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला त्यावेळी केंद्र सरकारने ‘सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ’ची स्थापना केली. यामुळे तमिळ साहित्य, प्राचीन ग्रंथाचा अनुवाद, संशोधन याच बरोबर शिक्षणाच्या वृद्धिंगतासाठी अनेक साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली. याच धर्तीवर मुंबईत ‘सेंट्रल युनिव्हर्सिटी फॉर मराठी स्टडीज’ची स्थापना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आपण लोकसभेत शून्य प्रहरावेळी केली होती अस त्यांनी सांगितले.

भारतात मराठी भाषा ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा असून जिचा ८.३ कोटी जनता दैनंदिन जीवनात वापर करते. महाराष्ट्रात १२ हजार पेक्षा जास्त मराठी ग्रंथालय आहेत. परंतु या भाषेच्या संवर्धन व संशोधनासाठी अद्याप एकही केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली नाही. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी साहित्य, संस्कृती आणि मराठी भाषिक जनतेसाठी निश्चितच आभिमानाची बाब असून हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

सेंट्रल युनिवर्सिटी फॉर मराठी स्टडीजमुळे मराठी भाषेच्या संवर्धन, संरक्षण, संशोधन तसेच उच्च शिक्षणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमीकरण सोईचे होणार आहे.याची  दखल केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी घेतले असून ते संबंधित विभागाकडे पाठवल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले असल्याचे खा.वायकर यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमराठी