ठाणो : ठाणो महापालिकेतील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सदस्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता विविध सामाजिक संस्थांनीही या प्रकरणातील भ्रष्टाचार समोर येण्यासाठी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आह़े कुत्र्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आतार्पयत 5 कोटी 37 लाख 54 हजारांचा निधी खर्च केला असून आता तो पाण्यात गेल्याचे यातून स्पष्ट होत असल्याने त्याचे ऑडिट करावे, अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असे या संस्थांनी म्हटले आह़े
मुंब्य्रातील शाहीद खान आणि त्यानंतर ठाण्यातील एका 22 वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्यानंतर ठाण्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करूनही पुन्हा शहरात कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केले. त्यानंतर, या प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, ठाणो महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 2क्क्4 पासून कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतार्पयत 43 हजार 4क्क् कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून यासाठी 5 कोटी 37 लाख 54 हजार खर्च करण्यात आले आहेत. असे असतानाही आजही पाच ते सात हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण शिल्लक आहे.
प्रत्यक्षात पालिकेने प्रथम शहरात किती श्वान आहेत, यांची गणना करणो गरजेचे होते. त्यामुळे किती श्वानांवर शस्त्रक्रिया झाली, याची माहितीसुद्धा कितपत खरी आहे, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे.
- मिलिंद गायकवाड, पदाधिकारी, जाग सामाजिक संस्था
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणो अपेक्षित असून एक कोटींच्यावर खर्च जरी केला तरी त्याचे ऑडिट होणो गरजेचे असते. परंतु, येथे पाच कोटींच्यावर खर्च झालेला आहे. त्यामुळे त्याचे ऑडिट झाले पाहिजे. ते झाले नाही, तर न्यायालयात दाद मागितली जाईल.
- चंद्रहास तावडे, अध्यक्ष, जनमोर्चा