Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पार्किंगवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST

मुंबई : कांदिवली पश्चिम येथे एम.जी. रोडवर पटेल नगर ट्रॅफिक सिग्नलजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे ...

मुंबई : कांदिवली पश्चिम येथे एम.जी. रोडवर पटेल नगर ट्रॅफिक सिग्नलजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. या अनधिकृत पार्किंग कारवाईची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

...........................

चेंबूरमध्ये फुटपाथवर फेरीवाल्यांचे बस्तान

मुंबई : नागरिकांच्या सोयीसाठी फुटपाथ बांधले आहेत. मात्र, चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ फुटपाथवर फेरीवाल्यांची गर्दी असते. पादचाऱ्यांना फुटपाथवरून चालायला जागाही मिळत नाही. वाहतुकीला अडथळा होतो. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

..............................

खराब रस्त्यामुळे वाहन चालकांचे हाल

मुंबई : कालिना कुर्ला रोडला जोडणाऱ्या रस्त्याची स्थिती वाईट आहे. रस्त्यापासून उड्डाणपुलापर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनांना व येथून येणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होत आहे. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी चालकांसह पादचाऱ्यांनी केली.

.................