Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला मारहाण करणाऱ्या टीसींवर कारवाईची मागणी

By admin | Updated: January 19, 2015 00:27 IST

ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे तिकीट तपासताना टीसीने प्रवाशांना मारहाण केली होती.

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे तिकीट तपासताना टीसीने प्रवाशांना मारहाण केली होती. या प्रकरणातील दोन्ही टीसी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने केली आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे टीसी कर्मचारी प्रवाशांचे तिकीट तपासत होते. दरम्यान, एका प्रवाशाला दोन टीसींनी मारहाण केल्याची घटना घडली होती. प्रवाशाला मारहाण केल्याची चित्रफीत ही सोशल साईटवर फिरत असून नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. टीसींची सुरू असलेली दबंगगिरी ताबडतोब बंद करावी. प्रवाशांना मारहाण करणाऱ्या टीसी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन बोबडे यांना निवेदन दिले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत धुरत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)