डहाणू : स्वत:च्या कौशल्यावर सोन्याचांदीचे दागिने घडविणाऱ्या डायमेकींगच्या व्यवसायाला शिक्षण, तंत्रज्ञान आणि संस्काराची जोड दिल्यास नवी पिढी अधिक सक्षमपणे व्यवसायभिमुख होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक यशस्वीपणे वाटचाल करील, असे विचार आमदार कपिल पाटील यांनी टिघरे पाडा येथे व्यक्त केले.टिघरेपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गावकऱ्यांनी सुवर्णमहोत्स साजरा केला. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कपिल पाटील बोलत होते. दुसरे प्रमुख पाहुणे आमदार पास्कल धनारे आणि चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आणि शिक्षण महर्षि रजनिकांतभाई श्रॉफ होते. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा प. सदस्य विनिता कोरे, पंचायत समिती सदस्य स्वप्नाली राऊत, उपवनसंरक्षक बाळकृष्ण पाटील, वसंत पाटील, आजी-माजी शिक्षक आणि विद्यार्थी स्वागताध्यक्ष जनार्दन मडवे, सचिव सुरेश पाटील आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार पास्कल धनारे यांनी दिधरेपाडा स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक जनार्दन मडवे यांनी केले. यावेळी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रजनिकांतभाई श्रॉफ यांनी डायमेकींगच्या सोन्याच्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास त्याचे प्लॅटीनम होईल असे सांगितले.यावेळी बाळकृष्ण पाटील, स्वप्नाली राऊत, भास्कर पाटील यांचीही भाषणे झाली.
डायमेकिंगला तंत्रज्ञानाबरोबर संस्काराची जोड हवी
By admin | Updated: February 17, 2015 22:50 IST