Join us

दिव्यातून १० बाल जरीकामगारांची सुटका

By admin | Updated: March 16, 2015 01:53 IST

दिवा-खर्डी रोडजवळील मदिना इमारतीच्या रुम नंबर ४०३ मध्ये जरीकाम करणाऱ्या ९ ते १६ वयोगटांतील १० बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली

मुंब्रा : दिवा-खर्डी रोडजवळील मदिना इमारतीच्या रुम नंबर ४०३ मध्ये जरीकाम करणाऱ्या ९ ते १६ वयोगटांतील १० बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली. मूळ बिहार राज्यात राहणारा विरल बालमजूर मागील ४ महिन्यांपासून संबंधित ठिकाणी काम करीत आहे. याप्रकरणी कुर्बान शेख याला अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर मुलाची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात करण्यात येणार असून त्याचे पालक आल्यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता करून मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.