Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वे प्रवाशांची दैना

By admin | Updated: June 4, 2014 22:55 IST

मध्य रेल्वेची परंपरा पश्चिम रेल्वेनेही सुरुच ठेवली असल्याचे बुधवारी दिसून आले.

ओव्हरहेड वायर तुटल्याने गर्दीच्या वेळी सेवा कोलमडलीमुंबई - मध्य रेल्वेची परंपरा पश्चिम रेल्वेनेही सुरुच ठेवली असल्याचे बुधवारी दिसून आले. चर्नीरोड स्थानकाजवळ डाऊनला जाणार्‍या जलद मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे कामावरुन घरी परतणार्‍या चाकरमान्यांचे मात्र प्रचंड हाल झाले. चर्नी रोड ते ग्रॅन्ट रोड स्थानकादरम्यान फ्रॅन्च ब्रीजच्या खालीच एक ओव्हरहेड वायर संध्याकाळी ६.0५ च्या सुमारास तुटली. विरारच्या दिशेने जाणार्‍या जलद मार्गावर ही घटना घडल्यामुळे सेवा ठप्पच झाली. त्यामुळे या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. बोरीवली, विरारच्या दिशेने जाणार्‍या धीम्या आणि जलद लोकल एकाच मार्गावरुन धावत असल्याने या सेवेचा बोर्‍या वाजण्यास सुरुवात झाली. लोकल तब्बल पंधरा मिनिटे उशिराने धावू लागल्या. संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे कामावरुन घरी परतणार्‍या मुंबईकरांचे मात्र हाल झाले. संध्याकाळी ६.२0 च्या सुमारास पॉवर ब्लॉक घेऊन ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम दहा मिनिटांत करण्यात आले आणि ही सेवा पुर्ववत करण्यात आली. मात्र रात्री नऊ वाजेपर्यंत धीम्या आणि जलद लोकल उशिरानेच धावत असल्याचे सूत्रांनी सांगितले.