Join us
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादपेक्षा दिल्लीचा घनकचरा वीजनिर्मिती प्रकल्प उत्तम

By admin | Updated: June 14, 2015 23:05 IST

हैदराबादपेक्षा दिल्लीतील एका प्रथितयश कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला घनकचरा वीजनिर्मितीचा प्रकल्प तुलनेने चांगला-प्रभावी आहे,

अनिकेत घमंडी, डोंबिवलीहैदराबादपेक्षा दिल्लीतील एका प्रथितयश कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेला घनकचरा वीजनिर्मितीचा प्रकल्प तुलनेने चांगला-प्रभावी आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवली महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे, मनसेचे गटनेते सुदेश चुडनाईक यांनी दिली. त्यांच्या भूमिकेमुळे रॅम्को आणि वारांगल महापालिकांच्या घनकचरा प्रकल्प भेट-दौऱ्याचा अहवाल केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेसमोर येण्यापूर्वीच लालफितीत अडकण्याची चिन्हे आहेत.आयुक्त मधुकर अर्दड यांच्यासमवेत १०-१२ जून या कालावधीत हैदराबाद-वारांगल महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पहाणी दौऱ्यात ते होते. असाच एक दौरा साधारण पाच महिन्यांपूर्वी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीही दिल्लीत केला होता. त्यातही ते दोघे होते. या दोन्ही दौऱ्यांतील प्रकल्पांच्या तुलनेने दिल्लीचा प्रकल्प कमी खर्चिक असून जागाही कमी व्यापणारा आणि वीजनिर्मितीसह उरलेल्या टाकाऊ मालातून ‘अ‍ॅश ब्रिक्स’चे उत्पादन घेणारा आहे. तो अनुसरल्यास कचऱ्याचा डोंगर नको ही उंबर्डेवासीयांची तक्रारही निकाली निघेल, असे त्यांनी म्हटले आहे.