Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील सराईत गुंडाला मुंबईत अटक

By admin | Updated: November 3, 2015 03:08 IST

खंडणी न दिल्याने दिल्लीतील एका कापड व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून फरार झालेल्या सराईत गुंडाला मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

मुंबई : खंडणी न दिल्याने दिल्लीतील एका कापड व्यावसायिकाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून फरार झालेल्या सराईत गुंडाला मुंबईच्या गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. केशव कक्कड (३५) असे आरोपीचे नाव असून वर्सोव्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याला आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. २७ आॅक्टोबरला त्याने सहकाऱ्यांसमवेत दिल्लीतील प्रसादनगरातील टॅक रोड मार्केटमधील तयार कपड्याच्या दुकानात जावून खंडणी मागितली. दुकान मालकाकडे त्याला नकार देताच पेट्रोल अंगावर ओतून पेटवून दिले. यात व्यापाऱ्याच्या दुकानही पेटले. या प्रकारात व्यापाऱ्यासह ५ जण भाजले गेले. त्यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला, तर दुकानमालक ८३ टक्के भाजला.