Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅकजवळील रुळांचे तुकडे हटविले

By admin | Updated: February 13, 2017 03:49 IST

रेल्वे रुळांवर रुळांचे तुकडे व अन्य वस्तू टाकून घातपाताचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे प्रकार लक्षात घेता, सीएसटी ते मस्जिद बंदर दरम्यान रुळांशेजारी असणारे

मुंबई : रेल्वे रुळांवर रुळांचे तुकडे व अन्य वस्तू टाकून घातपाताचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे हे प्रकार लक्षात घेता, सीएसटी ते मस्जिद बंदर दरम्यान रुळांशेजारी असणारे २,५00 मेट्रिक टन रुळांचे तुकडे रेल्वेकडून रविवारी हटवण्यात आल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दिली. मार्गिका बदलणे, रुळांचा भाग बदलण्यासाठी अतिरिक्त तुकड्यांचा वापर केला जातो. मात्र, घातपाताचा प्रकार लक्षात घेता, हे तुकडे उचलण्यात येत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)