Join us

पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक उशिराने

By admin | Updated: April 24, 2016 08:07 IST

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २४ - पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणा-या गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. बोरिवली-कांदिवली स्थानका दरम्यान पेंटाग्राफ तुटल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. 
 
आता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरी, लोकल गाडया काही मिनिटे उशिराने धावत आहेत. आज रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमी असेल. इतर दिवशी हा बिघाड झाला असता तर कामावर जाणा-या लाखो प्रवाशांचे हाल झाले असते.