Join us

मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

By admin | Updated: July 23, 2015 01:39 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील सूतगिरणीच्या भागभांडवलाचा निधी आपण उदरनिर्वाहाकरिता वापरला या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील सूतगिरणीच्या भागभांडवलाचा निधी आपण उदरनिर्वाहाकरिता वापरला या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपाबाबत आपल्याला कुठलीही नोटीस देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा आपल्या विशेषाधिकाराचा भंग झाला असल्याचे सांगत माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव तपासून हक्कभंग समितीकडे पाठवायचा किंवा कसे याचा निर्णय घेतला जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २० जुलै रोजी विधानसभेत शेतकरी आत्महत्या या विषयावरील चर्चेला उत्तर देताना माझ्या नावाचा उल्लेख करून सूतगिरणीचा निधी उदरनिर्वाहाकरिता वापरल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र तथ्य आढळले तर मी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देईन व राजकारणातून निवृत्त होईन. मात्र माझ्यावर केले गेलेले आरोप खोटेनाटे असल्याने हा हक्कभंग प्रस्ताव सादर करीत आहे.