बंगळुरू : बॉलिवूड किंग आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर्सने मिळविलेले इंडियन प्रिमीअर लीगचे (आयपीएल) विजेतेपद आपला मुलगा अबराम याला समर्पित केले आह़े फायनल लढत संपल्यानंतर शाहरुखने किंग्ज इलेव्हन संघाची मालक ीण प्रीती ङिांटा हिच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा टी शर्ट परिधान करून आपले मन किती मोठे आहे, हे दाखवून दिल़े शाहरुख म्हणाला, ‘‘आयपीएलमधील संघमालक नव्हे, तर एका मुलाचा वडील म्हणून मी या सामन्यातील विजय मुलगा अबराम याला समर्पित करू इच्छितो़ आम्ही पुन्हा एकदा आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यात यशस्वी ठरलो, याचा आनंद आह़े
जेतेपद अबरामला समर्पित : शाहरुख
By admin | Updated: June 2, 2014 23:56 IST