Join us  

‘भगवा फडकवून घोषणा देणे अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 2:50 AM

अर्जदाराने भगवा झेंडा फडकावून ‘जय भवानी, जय महादेव, जय शिवराय’ अशा घोषणा दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

मुंबई : भगवा झेंडा फडकावून घोषणा देणे हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीअंतर्गत (अत्याचार प्रतिबंध कायदा) गुन्हा होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविलेल्या एका व्यक्तीचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना नोंदविले.राहुल शशिकांत महाजन याच्यावर कल्याण पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला. त्याने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावरील सुनावनी न्या. इंद्रजीत महंती व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे होती. कल्याण सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनास नकार दिल्याने त्याने उच्च न्यायालयात अर्ज केला.अटकपूर्व जामीन मंजूरअर्जदाराने भगवा झेंडा फडकावून ‘जय भवानी, जय महादेव, जय शिवराय’ अशा घोषणा दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मात्र, भगवा फडकाविणे आणि घोषणा देणे, हे अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हेगारी कृत्य नव्हे, असे आमचे मत आहे. त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत आरोपीचा अटकपूर्व जामीन किंवा जामीन मंजूर न करण्याची अट येथे लागू होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

टॅग्स :न्यायालय