मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्याकडून सदस्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बुक्टो, मनविसे आणि युवा सेनेच्या सदस्यांनी सिनेट बैठकीत कुलगुरू हटाव, अशी घोषणाबाजी करत विद्यापीठ परिसर दणाणून सोडला. सदस्याने बोलण्याची संधी मिळावी यासाठी हात वर केल्याने संतप्त झालेले कुलगुरू सभागृह सोडून बाहेर गेले. याचा निषेध करत सदस्यांनी सिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला.
विद्यापीठाची सिनेट बैठक शुक्रवारी फोर्ट येथील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सिनेट सदस्यांनी अॅक्शन टेकन रिपोर्टवर विविध प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांना वेळुकर उत्तर देत होते. त्या वेळी एका सिनेट सदस्याने बोलण्यासाठी हात वर केल्याने कुलगुरूंच्या रागाचा पारा चढला. आपला राग व्यक्त करत कुलगुरूंनी सभागृहातून काढता पाय घेतला. यामुळे सर्वच सदस्य आक्रमक झाले. कुलगुरू सभागृहात पुन्हा आल्यानंतर सदस्यांनी सभागृहाची माफी मागण्याची मागणी केली. मात्र, कुलगुरू दाद देत नसल्याने युवा सेना, मनविसे आणि प्राध्यापकांच्या
बुक्टो संघटनेच्या सदस्यांनी कुलगुरूंच्या कृत्याचा निषेध नोंदवत सभागृहात गदारोळ सुरू करत
अखेर सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. सिनेट सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी देण्यात येत नसल्याने सर्व सदस्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी विद्यापीठातील अधिका:यांनी सदस्यांनी सभागृहात बसण्याची विनंती केली.
मात्र, सदस्यांनी त्यांच्या विनंतीला धुडकावून लावत घोषणाबाजी सुरूच ठेवली. ‘नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, कुलगुरू हाय हाय, हिटलरशाही नही चलेगी अशा घोषणाबाजीने विद्यापीठ परिसर दणाणून गेला. डोंबिवली येथील पेंढारकर महाविद्यालयाने विद्याथ्र्याकडून वसूल केलेली जादा शुल्क, एमकेसीएलचा गोंधळ, मागासवर्गीय विद्याथ्र्याकडे होणारे दुर्लक्ष अशा विविध प्रश्नांवर सदस्यांनी कुलगुरूंना धारेवर धरले. (प्रतिनिधी)
च्मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रत होणारे नागरीकरण, लोकसंख्या आणि त्या पाश्र्वभूमीवर शिक्षण, रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने 2क्15-16 या वर्षाचा तयार केलेला बृहत् आराखडा शुक्रवारी सिनेटमध्ये मंजूर करण्यात आला. केवळ 32 सदस्यांच्या उपस्थितीत या आराखडय़ास मंजुरी देण्यात आली.
च्या आराखडय़ात नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांसह कम्युनिटी कॉलेजांना प्राधान्य देण्यात आले आहे. अभियांत्रिकीच्या नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी नव्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेल्या आठ अभ्यासक्रमांच्या शाखाही विकसित करण्यात येणार आहेत. तसेच अतिरिक्त तुकडय़ांची संख्या वाढविण्यात येणार आहेत. तर कम्युनिटी कॉलेजसह नाइट महाविद्यालयांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
पालघर जिल्ह्यात नवीन महाविद्यालये होणार
ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये नवीन महाविद्यालय सुरू करण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी द्यावी, अशी सूचना सिनेट सभागृहाने विद्यापीठ प्रशासनाला केली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात नवीन महाविद्यालये सुरू होण्याच्या मार्गातील एक अडथळा दूर झाला आहे.