Join us

गणेश मंडळात वायरिंगचे काम करताना मृत्यू

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

कुर्ल्याच्या मंडळात वायरिंगचे

कुर्ल्याच्या मंडळात वायरिंगचे
काम करताना तरुणाचा मृत्यू

मुंबई: गणपतीच्या मंडपात वायरिंगचे करत असताना रितेश पोळ (३०) या तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. कुर्ल्यातील बेने इस्त्रायल चर्च परिसरात ही घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
कुर्ला पि›म येथील बुध्द विहार कॉलनीत दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील बाळ गोपाल मित्र मंडळाकडून सार्वजनिक गणेशत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी याच परिसरात राहणारा रितेश हा नेहमीप्रमाणे मंडपाच्या मागच्या बाजूला वायरिंगचे काम करत होता. याच दरम्यान विद्युतप्रवाह सुरु असलेल्या वायरला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जोरात विजेचा झटका बसला. बराच वेळ त्याची सुटका न झाल्याने परिसरातील रहिवाशांनी तत्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाची सुटका केली. त्यानंतर त्याला कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला होता. याबाबत कुर्ला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरु केला आहे. (प्रतिनिधी)