Join us

विजेच्या धक्क्याने तरूण जखमी, तीन म्हशींचा मृत्यू

By admin | Updated: July 20, 2014 23:58 IST

म्हशींच्या आवाजाने त्यांना पाहण्यासाठी गेलेला नामदेव घरत (१८) हा तरूणही विजेचा संपर्कात आल्याने त्यासही झटका बसून तो लांब फेकला गेला

म्हारळ : मुरबाड महामार्गावरील आणे गावाजवळ शनिवारी रात्री ८ च्या सुमारास गावाकडून नदीकडे जाणाऱ्या परिसरात विजेचा खांब कोसळल्याने जवळपास चरणाऱ्या म्हशींना चालू प्रवाहाचा धक्का लागल्याने त्या तेथेच कोसळल्या. त्यातील तीन म्हशी जागेवरच दगावल्या. म्हशींच्या आवाजाने त्यांना पाहण्यासाठी गेलेला नामदेव घरत (१८) हा तरूणही विजेचा संपर्कात आल्याने त्यासही झटका बसून तो लांब फेकला गेला. त्यास उपचारासाठी गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ग्रामस्थांनी वीजप्रवाह खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी खांब कोसळला आहे त्या ठिकाणी बंधाराअसून त्या बंधाऱ्याजवळ ग्रामस्थ मासेमारीसाठी नेहमी जातात. दुर्घटना घडण्याआधी जवळपास ३० ग्रामस्थ मासे पकडण्यासाठी येथे जाणार होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. (वार्ताहर)