Join us

संशयित डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू

By admin | Updated: November 16, 2014 01:51 IST

मुलुंड येथे राहणा:या 52वर्षीय पुरुषाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे एका खासगी रुग्णालयाने महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाला शनिवारी कळवले.

मुंबई : मुलुंड येथे राहणा:या 52वर्षीय पुरुषाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे एका खासगी रुग्णालयाने महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाला शनिवारी कळवले. मात्र, पूर्ण कागदपत्रे आल्यावर कमिटीमध्ये त्या व्यक्तीला डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यावरच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होईल. सध्या संशयित डेंग्यूच्या रुग्णाचा मृत्यू झाला असून, हा आठवडय़ातला दुसरा रुग्ण आहे. आतार्पयत डेंग्यूमुळे 1क् जणांचा मृत्यू झाल्याची माहिती साथ रोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुथ डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. 
मुलुंड येथे राहणा:या 52वर्षीय व्यक्तीला त्रस जाणवू लागल्याने 5 नोव्हेंबर रोजी सारथी रुग्णालयात दाखल केले होते. या व्यक्तीला अस्थमा आणि मधुमेहाचा त्रस होता. दुस:या दिवशीच या व्यक्तीच्या प्लेटलेट्स कमी होऊ लागल्या. यानंतर या व्यक्तीला 8 नोव्हेंबर रोजी फोर्टीस रुग्णालयात हलवले.  त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र शनिवारी सकाळी 1क् वाजता त्याचा मृत्यू झाला. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती साथरोग नियंत्रण कक्षाला पाठविली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)