मुंबई - लोकलमधून पडून झालेल्या अपघातात एक तरुण मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. रे रोड स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेत हा तरुण स्टंट करत असताना अपघात झाल्याचे सांगितले जाते. २५ ते ३0 वयोगटातील एक तरुण डाऊनला जाणार्या एका लोकलमधून डॉकयार्ड ते रे रोड स्थानकादरम्यान पडला. हा तरुण या दोन्ही स्थानकादरम्यान असलेल्या पुलाजवळच्याच मलिम हायरिंग वर्कशॉपच्या छतावर पडला. सकाळी ११ च्या सुमारास हे दुकान उघडण्याच्या तयारी असणार्या मालकाच्या ही बाब निदर्शनास आली आणि त्यांनी त्वरीत पोलिसांना याची माहीती दिली. याबाबत वडाळा रेल्वे पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक खोत यांनी सांगितले की, हा अपघात स्टंट करताना झाल्याचे निश्चित असे सांगणे कठीण असून या घटनेची चौकशी करत आहोत. घटनेची माहीती मिळताच जवळच्याच रुग्णालयात या तरुणाला नेण्यात आले. मात्र तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. या तरुणांच्या अंगावर बनियान आणि हाफ पॅन्ट होती.
स्टंट करताना तरुणाचा मृत्यू?
By admin | Updated: May 28, 2014 23:37 IST