Join us  

गोरेगावमध्ये वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 6:42 AM

गोरेगावमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : गोरेगावमध्ये वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. या प्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गोरेगाव पश्चिमेकडील रोडलगत ती मयत व्यक्ती राहायची. त्यांची ओळख पटलेली नाही. १ जून रोजी पहाटे ४ च्या सुमारास ते झोपेत असताना, एका वाहनचालकाने त्यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची वर्दी लागताच बांगूरनगर पोलीस तेथे दाखल झाले. शनिवारी उपचारादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी बनून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बांगूरनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :अपघात