Join us
Daily Top 2Weekly Top 5

झोका घेताना फास लागून चिमुरडय़ाचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2014 03:23 IST

पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

कल्याण : पूर्वेकडील कर्पेवाडी परिसरात कपडे वाळत घालण्याच्या नायलॉन दोरीचा झोपाळा बनवून त्यावर झोका घेणा:या क्षितिज आव्हाड या 10 वर्षीय मुलाचा गळय़ाला फास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. 
कर्पेवाडीतील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये नरेश आव्हाड हे परिवारासह राहतात. त्यांची प}ी गुरुवारी सायंकाळी सामान आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी क्षितिज (वय 1क्) आणि ईशा (वय 12) ही त्यांची दोन मुले घरात एकटीच होती. बहीण झोपी गेल्याचे पाहून क्षितिजने कपडे वाळत घालण्याच्या दोरीचा झोपाळा केला आणि त्यावर तो झोका घेऊ लागला़ यात अचानक तोल सुटला आणि दोरीचा फास त्याच्या गळय़ाभोवती आवळला गेला. नरेश हे सायंकाळी पावणोसहाच्या सुमारास 
कामावरून घरी आले असता, त्यांना क्षितिज दरवाजामागे नायलॉन दोरीला लटकलेल्या आणि तोंडातून फेस येत असल्याच्या अवस्थेत आढळला. (प्रतिनिधी)