Join us

जखमी वाहतूक हवालदाराचा मृत्यू

By admin | Updated: January 6, 2016 01:42 IST

वर्दळीच्या ठिकाणी भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत, गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदार नितीन परब यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.

मुंबई : वर्दळीच्या ठिकाणी भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत, गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदार नितीन परब यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात गेले दोन दिवस उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी माटुंगा परिसरात विनोद कडलक याने दिलेल्या धडकेत परब गंभीर जखमी झाले होते. परब हे पत्नी व बारा वर्षांच्या मुलासह चेंबूर पोलीस क्वार्टर्समध्ये राहात होते. यापूर्वी त्यांनी चेंबूर, सायन, डोंगरी आणि व्ही.बी. नगर या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात काम केले होते. सध्या ते माटुंगा वाहतूक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान, मोटारसायकलस्वाराने धडक दिल्याने, गंभीर जखमी झाले होते. परब यांच्यावर दोन दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलस्वार विनोद कडलक याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)